Ad will apear here
Next
विद्यार्थ्यांनी बनवल्या कचऱ्यातून कलात्मक वस्तू
पर्यावरणपूरक दिवाळीसाठी ‘सूर्यदत्ता’चा उपक्रम

पुणे : सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरवले  आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ गोष्टींपासून अनेक नाविन्यपूर्ण कलाकृती साकारल्या असून, अश्म युग ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचा मनुष्याचा प्रवास येथे पहायला मिळतो.

  
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, वेळेचे महत्त्व कळावे या उद्देशाने शाळेने हे प्रदर्शन आयोजित केले आहे.  सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या या कला प्रदर्शनातून दिवाळी अतिशय साध्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी, असा संदेश दिला आहे. सूर्यदत्ताच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील शिक्षण आणि व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ज्यामुळे उत्तम विद्यार्थी घडतील आणि समाजासाठी उत्कृष्ट कामगिरी करतील.’ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZTBCF
Similar Posts
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
चिमुकल्यांनी केली पर्यावरणपूरक दिवाळीची तयारी पुणे : बावधनमधील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी स्वतःच आकर्षक कंदील, तोरणे आणि रंगीत पणत्या तयार केल्या. त्यांना या कामात पालकांनीही उत्साहाने मदत केली. रंगीबेरंगी कागद, खडू, माती यांच्या साह्याने मुलांनी सुंदर आकाशकंदील आणि नक्षीदार पणत्या बनवल्या
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
'सूर्यदत्ता'च्या युवराज दळवीचे लॉन टेनिस स्पर्धेत यश पुणे : सोलापूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या १७ वर्षाखालील विभागीय लॉन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेजच्या युवराज दळवी याने यश प्राप्त केले. विभागीय स्पर्धेत यश मिळवल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी युवराज दळवी याला मिळणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language